आजकाल सर्व विद्यार्थ्यांना खाजगी क्लासेसची सवय झाली आहे. अगदी ५ वी पासुन एम कॉम पर्यंत आणि तत्सम इतर कोर्ससाठी खाजगी क्लासेस सहजरीत्या उपलब्ध आहेत. खरच या खाजगी शिकवण्यांची गरज आहे का? खाजगी शिकवण्यांशिवाय ऊत्तीर्ण होणे अशक्य आहे का...?
यातील पहिल्या प्रश्नाचे ऊत्तर मी "हो" असेच देईन. याचे कारण आपल्या सि ए च्या अभ्यासक्रमातील Quantitative Aptitude (Maths), Accounts, Cost Accounting, Quantitative Techniques सारखे विषय स्वतः अभ्यास करून समजाऊन घेणे खुप अवघड जाते. (own experience..!) बरं हे विषय नुसते समजुन घेणे ऊपयोगाचे नाही तर परीक्षेत Practical Problems कमीत कमी वेळेत सोडवता आले पाहिजेत. थोडक्यात वेळेचे व्यवस्थापन (Time Management) आणी Logical Solution पर्यंत कसे पोहोचायचे हे क्लासेसमध्ये शिकवले जाते. इतर विषयांना (Theoretical Subjects) माझ्या मते क्लासची गरज मुळीच नाही.
आता दुसरा प्रश्न म्हणजे 'खाजगी शिकवण्यांशिवाय ऊत्तीर्ण होणे अशक्य आहे का?' याचे उत्तर मी असे देईन, खाजगी शिकवण्यांशिवाय ऊत्तीर्ण होणे अशक्य नाही तर ते थोऽऽडेसे अवघड आहे. अर्थातच क्लास नसेल तर सर्व विषय हे स्वतःच समजावुन घ्यावे लागतात (कि ज्या प्रक्रियेला जास्त वेळ द्यावा लागतो). एक Practical Chapter कि ज्याला क्लासमध्ये शिकवायला एक ते दोन दिवस लागतात तोच स्वतः करायला आठवडाही लागु शकतो.
परंतु क्लास लावावेच लागतात असे काहि अनिवार्य नाही. आणि क्लास लावुनही ऊत्तीर्ण होतोच असेहि नाही. शेवटी क्लास लावा किंवा न लावा अभ्यास हा स्वतःलाच करावा लागतो. जोपर्यंत स्वतः कष्ट करीत नाही तपर्यंत ऊत्तीर्ण होणे अशक्य आहे.
Wednesday, 18 July 2007
Sunday, 1 July 2007
% निकालाची टक्केवारी %
सि ए च्या परिक्षांचा निकाल खुप कमी लागतो..दरवेळी जेवढी सि एंची गरज आहे तेवढेच विद्यार्थि पास केले जातात..असे आणि आणखी अनेक गैरसमज आजही आपल्या पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या बोलण्यातुन, वागण्यातुन जाणवतात. मुलाला सि ए च्या कोर्सला घालायचे म्हणजे तुरुंगात पाठवायचे असेही काहिंना वाटते. कारण सि ए चा आभ्यास म्हणजे खुप अवघड, न संपणारा, न झेपणारा..इत्यादि..इत्यादि.
निकालाच्या टक्केवारी बाबतच जर बोलायचे झाले तर आपल्या नेहमी असे कानावर येते कि १ ते ५ टक्के मुलेच फक्त यशस्वि होतात. प्रत्यक्षात तसे काहिही नाही. आपण मे २००५ च्या परीक्षेतिल पास होणाऱ् या मुलांची टक्केवारी पाहिली तर ती १४.४०% एवढी होती, पुढे जर नोव्हेंबर २००५ आणि मे २००६ ची टक्केवारी पाहिली तर ती अणुक्रमे १७.६५% आणि २२.८१% इतकी होती. या आकडेवारीवरुन असे दिसुन येते कि दरवर्षी सि ए बनणाऱ् या विद्यार्थ्यांची संख्या ही वाढतीच आहे न की १ ते ५ % पर्यंतच मर्यादित आहे.

Wednesday, 27 June 2007
प्रवेश फी..बापरेऽऽ
"मुलांचे उच्च शिक्षण म्हणजे भरमसाठ खर्च", असे वाक्य आपल्या नेहमीच कानावर पडते. अशी विधाने मुख्यता: मध्यम आणि सामान्य ऊत्पन्न असलेल्या वर्गातील लोकांची असतात. आणि म्हणुन खर्च करायचा नसतो अशी त्यामागील भावना असते असे नाही. अमुक अमुक कोर्सला प्रवेश घ्यायचा म्हणजे किती खर्च..? असा हिशोब अगदि मुलांच्या १०वी १२वी च्या परिक्षा झाल्यापासुन चालु होतो.
अर्थात बाकीच्या कोर्सेसची फी तुलनात्मकरित्या जास्तच असते. कधी कधी तर पालकांना कर्जेही काढावी लागतात.
आता बाकीच्या विषयाकडुन आपण आपल्या (सि ए च्या) फी स्ट्रक्चर कडे वळुयात. नविन बदलानुसार १ जुलै २००७ पासुन CPT COURCE (थोडक्यात नविन प्रवेशा) साठी रु ३५००/- इतकी प्रवेश फी आहे. हे फी स्ट्रक्चर इतर कोर्सेसपेक्षा नक्कीच कमी आणि रास्त आहे असे मला वाटते. आणि प्रवेशासाठी आणखी काही डोनेशन वैगेरे असे काहिही द्यावे लागत नाही कि जे इतर ठिकाणि अनिवार्य असते!
सि ए ला प्रवेश फी ही नेहमीच डिमांड ड्राफ्टनेच भरावी लागते. परिणामी इतर ठिकाणि होणारे (गैर)प्रकार इथे होत नाहित. त्यामुळे प्रवेश फी ला घाबरुन जाऊन निर्णय बदलु नयेत.

Tuesday, 26 June 2007
हुशारी लागते?
मि खुपदा लोकांच्या तोंडुन ऐकतो कि सि ए करायचे म्हणजे ८० ते ९० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण किंवा अगदीच हुशार मुलगा/मुलगी असेल तरच धाडस करण्यात अर्थ आहे. प्रत्यक्षात तसे काहीच नाही. चार्टर्ड अकौंटंट कोर्स हा फक्त हुशार मुलांनीच करावा असे काहिही नाही. सध्याच्या नविन बदलानुसार फक्त ५० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण असलेल्या कोणत्याही शाखेच्या विद्यर्थ्याला (१० वी/१२ वी नंतर आणि पदविनंतर) सि ए साठी प्रवेश घेता येतो. म्हणजेच सर्वसाधारण बुद्धिमत्ता असणाऱ् या विद्यार्थ्याला सुद्धा हे दार उघडे आहे. कारण मि याआधीच्या लेखात नमुद केल्याप्रमाणे याचे स्वरुप पुर्णपने वेगळे असल्यामुळे प्रवेश घेतल्यानंतर जो कष्ट घेतो आणि मनापासुन अभ्यास करतो तोच या स्पर्धेत टिकु शकतो. दुसरे असे कि हुशारी हि काही ऊपजतच येते असे नाही. सततचे वाचन, चिंतन, आणि लेखन यातुनच ठराविक विषयामध्ये प्राविण्य प्राप्त करता येते. सि ए च्या कोर्ससाठी सर्वात महत्वाची बाब आहे ती म्हणजे 'जिद्द'. ती जर का तुम्ही सोडली नाही तर हुशारी आपोआपच येते. त्यामुळे चालत आलेल्या अफवांवर विश्वास न ठेवता माहितीगार व्यक्तिंकडुन मार्गदर्शन घेणे कधीही योग्यच ! नाहीतर हे व्यासपिठ आपल्यासाठी खुले आहेच.
Sunday, 24 June 2007
न्युनगंड
मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांना पदविनंतरच्या अभ्यासक्रमांविषयी/कोर्सेसविषयी विशेषत: चार्टर्ड अकौंटन्सी कोर्सविषयी बरेच न्युनगंड असतात. त्यापैकी सर्वात महत्वाचा म्हणजे इंग्रजी भाषा झेपेल का? इंग्रजीमध्ये लिहिता येईल का? इत्यादि. खरे तर पदवीपर्यंत मराठी माध्यमातुन शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना compulsory आणि special असे एक ते तिन विषय इंग्रजीमध्ये असतातच. त्यामुळे तसं पाहता इंग्रजीचा सहवास हा असतोच. चार्टर्ड अकौंटंसीचा कोर्स हा पुर्णता इंग्रजीमध्येच आहे असे नाही. हिंदी माध्यमातही परिक्षा देता येते. पण एकंदरीत पाहता हिंदीपेक्षा इंग्रजी माध्यम सोपे जाते. पदवीपर्यंतचे इंग्रजी आणि सि ए चे इंग्रजी यामध्ये भरपुर फरक असतो. पदवीपर्यंतचे इंग्रजी लिखाण बहूतेक करुन पाठांतरावर अवलंबुन असते (कि जसे माझेहि होते..!!), समजाऊन घेऊन आपल्या भाषेत उत्तरपत्रिकेवर लिहिणे म्हणजे दिव्यच..! परंतु जेव्हा तुम्ही सि ए ची परिक्षा देता तेव्हा उत्तरपत्रिकेवर पाठांतर केलेले पुर्णपने काहिही उतरत नाही. कारण प्रत्येक विषयाचा अभ्यासक्रम हा खुप vast असतो. प्रत्येक प्रकरण लक्षात राहणं तस मुश्किलच. म्हणुनच प्रत्येक प्रकरण समजाऊन घेणं अत्यावशक असतं. वारंवार वाचन हा एक मार्ग अवलंबला तर विषयावर पकड बसायला सोपं जातं. पदविपर्यंतचे वाणिज्य शाखेचे ज्ञान हे सि ए च्या अभ्यासक्रमापुढे खुप कमी असते. खरा वाणिज्य अभ्यासक्रम सि ए ला प्रवेश घेतल्यानंतर चालु होतो असे म्हंटले तरी ते गैर होणार नाही.
काही लिहिण्याअगोदर...
मला मराठीचा अभिमान असला तरी मराठीमध्ये शुध्दलेखनाच्या नियमानुसारच लेखन होईल असे नाही. काही चुका होतीलच हे वाचकांनी गृहित धरूनच माहिती वाचावी.
॥पांनलोक॥
॥पांनलोक॥
Subscribe to:
Comments (Atom)