Wednesday, 18 July 2007

॰गरज खाजगी क्लासेसची॰

आजकाल सर्व विद्यार्थ्यांना खाजगी क्लासेसची सवय झाली आहे. अगदी ५ वी पासुन एम कॉम पर्यंत आणि तत्सम इतर कोर्ससाठी खाजगी क्लासेस सहजरीत्या उपलब्ध आहेत. खरच या खाजगी शिकवण्यांची गरज आहे का? खाजगी शिकवण्यांशिवाय ऊत्तीर्ण होणे अशक्य आहे का...?
यातील पहिल्या प्रश्नाचे ऊत्तर मी "हो" असेच देईन. याचे कारण आपल्या सि ए च्या अभ्यासक्रमातील Quantitative Aptitude (Maths), Accounts, Cost Accounting, Quantitative Techniques सारखे विषय स्वतः अभ्यास करून समजाऊन घेणे खुप अवघड जाते. (own experience..!) बरं हे विषय नुसते समजुन घेणे ऊपयोगाचे नाही तर परीक्षेत Practical Problems कमीत कमी वेळेत सोडवता आले पाहिजेत. थोडक्यात वेळेचे व्यवस्थापन (Time Management) आणी Logical Solution पर्यंत कसे पोहोचायचे हे क्लासेसमध्ये शिकवले जाते. इतर विषयांना (Theoretical Subjects) माझ्या मते क्लासची गरज मुळीच नाही.
आता दुसरा प्रश्न म्हणजे 'खाजगी शिकवण्यांशिवाय ऊत्तीर्ण होणे अशक्य आहे का?' याचे उत्तर मी असे देईन, खाजगी शिकवण्यांशिवाय ऊत्तीर्ण होणे अशक्य नाही तर ते थोऽऽडेसे अवघड आहे. अर्थातच क्लास नसेल तर सर्व विषय हे स्वतःच समजावुन घ्यावे लागतात (कि ज्या प्रक्रियेला जास्त वेळ द्यावा लागतो). एक Practical Chapter कि ज्याला क्लासमध्ये शिकवायला एक ते दोन दिवस लागतात तोच स्वतः करायला आठवडाही लागु शकतो.
परंतु क्लास लावावेच लागतात असे काहि अनिवार्य नाही. आणि क्लास लावुनही ऊत्तीर्ण होतोच असेहि नाही. शेवटी क्लास लावा किंवा न लावा अभ्यास हा स्वतःलाच करावा लागतो. जोपर्यंत स्वतः कष्ट करीत नाही तपर्यंत ऊत्तीर्ण होणे अशक्य आहे.

No comments: