Sunday, 24 June 2007

न्युनगंड

मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांना पदविनंतरच्या अभ्यासक्रमांविषयी/कोर्सेसविषयी विशेषत: चार्टर्ड अकौंटन्सी कोर्सविषयी बरेच न्युनगंड असतात. त्यापैकी सर्वात महत्वाचा म्हणजे इंग्रजी भाषा झेपेल का? इंग्रजीमध्ये लिहिता येईल का? इत्यादि. खरे तर पदवीपर्यंत मराठी माध्यमातुन शिकणाऱ्‍या विद्यार्थ्यांना compulsory आणि special असे एक ते तिन विषय इंग्रजीमध्ये असतातच. त्यामुळे तसं पाहता इंग्रजीचा सहवास हा असतोच. चार्टर्ड अकौंटंसीचा कोर्स हा पुर्णता इंग्रजीमध्येच आहे असे नाही. हिंदी माध्यमातही परिक्षा देता येते. पण एकंदरीत पाहता हिंदीपेक्षा इंग्रजी माध्यम सोपे जाते. पदवीपर्यंतचे इंग्रजी आणि सि ए चे इंग्रजी यामध्ये भरपुर फरक असतो. पदवीपर्यंतचे इंग्रजी लिखाण बहूतेक करुन पाठांतरावर अवलंबुन असते (कि जसे माझेहि होते..!!), समजाऊन घेऊन आपल्या भाषेत उत्तरपत्रिकेवर लिहिणे म्हणजे दिव्यच..! परंतु जेव्हा तुम्ही सि ए ची परिक्षा देता तेव्हा उत्तरपत्रिकेवर पाठांतर केलेले पुर्णपने काहिही उतरत नाही. कारण प्रत्येक विषयाचा अभ्यासक्रम हा खुप vast असतो. प्रत्येक प्रकरण लक्षात राहणं तस मुश्किलच. म्हणुनच प्रत्येक प्रकरण समजाऊन घेणं अत्यावशक असतं. वारंवार वाचन हा एक मार्ग अवलंबला तर विषयावर पकड बसायला सोपं जातं. पदविपर्यंतचे वाणिज्य शाखेचे ज्ञान हे सि ए च्या अभ्यासक्रमापुढे खुप कमी असते. खरा वाणिज्य अभ्यासक्रम सि ए ला प्रवेश घेतल्यानंतर चालु होतो असे म्हंटले तरी ते गैर होणार नाही.

2 comments:

Unknown said...

Its a very beautiful script you had written, too good but we the marathi people fid it very small and no inspiration from it, no guidance from it, kindly update it more so we people will get motivated and encourage to adopt for such professional courses, simillar like you,

ALL THE BEST YEAR, ---$achin K.

Dnyaneshwar Jagtap said...

very nice ,

Dnyaneshwar jagtap