Wednesday, 27 June 2007

प्रवेश फी..बापरेऽऽ

"मुलांचे उच्च शिक्षण म्हणजे भरमसाठ खर्च", असे वाक्य आपल्या नेहमीच कानावर पडते. अशी विधाने मुख्यता: मध्यम आणि सामान्य ऊत्पन्न असलेल्या वर्गातील लोकांची असतात. आणि म्हणुन खर्च करायचा नसतो अशी त्यामागील भावना असते असे नाही. अमुक अमुक कोर्सला प्रवेश घ्यायचा म्हणजे किती खर्च..? असा हिशोब अगदि मुलांच्या १०वी १२वी च्या परिक्षा झाल्यापासुन चालु होतो.
अर्थात बाकीच्या कोर्सेसची फी तुलनात्मकरित्या जास्तच असते. कधी कधी तर पालकांना कर्जेही काढावी लागतात.
आता बाकीच्या विषयाकडुन आपण आपल्या (सि ए च्या) फी स्ट्रक्चर कडे वळुयात. नविन बदलानुसार १ जुलै २००७ पासुन CPT COURCE (थोडक्यात नविन प्रवेशा) साठी रु ३५००/- इतकी प्रवेश फी आहे. हे फी स्ट्रक्चर इतर कोर्सेसपेक्षा नक्कीच कमी आणि रास्त आहे असे मला वाटते. आणि प्रवेशासाठी आणखी काही डोनेशन वैगेरे असे काहिही द्यावे लागत नाही कि जे इतर ठिकाणि अनिवार्य असते!
सि ए ला प्रवेश फी ही नेहमीच डिमांड ड्राफ्टनेच भरावी लागते. परिणामी इतर ठिकाणि होणारे (गैर)प्रकार इथे होत नाहित. त्यामुळे प्रवेश फी ला घाबरुन जाऊन निर्णय बदलु नयेत.

1 comment:

Anonymous said...

namskar
aapla prayatna avadla

avinash & vivek