Sunday, 1 July 2007

% निकालाची टक्केवारी %

सि ए च्या परिक्षांचा निकाल खुप कमी लागतो..दरवेळी जेवढी सि एंची गरज आहे तेवढेच विद्यार्थि पास केले जातात..असे आणि आणखी अनेक गैरसमज आजही आपल्या पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या बोलण्यातुन, वागण्यातुन जाणवतात. मुलाला सि ए च्या कोर्सला घालायचे म्हणजे तुरुंगात पाठवायचे असेही काहिंना वाटते. कारण सि ए चा आभ्यास म्हणजे खुप अवघड, न संपणारा, न झेपणारा..इत्यादि..इत्यादि.
निकालाच्या टक्केवारी बाबतच जर बोलायचे झाले तर आपल्या नेहमी असे कानावर येते कि १ ते ५ टक्के मुलेच फक्त यशस्वि होतात. प्रत्यक्षात तसे काहिही नाही. आपण मे २००५ च्या परीक्षेतिल पास होणाऱ् या मुलांची टक्केवारी पाहिली तर ती १४.४०% एवढी होती, पुढे जर नोव्हेंबर २००५ आणि मे २००६ ची टक्केवारी पाहिली तर ती अणुक्रमे १७.६५% आणि २२.८१% इतकी होती. या आकडेवारीवरुन असे दिसुन येते कि दरवर्षी सि ए बनणाऱ् या विद्यार्थ्यांची संख्या ही वाढतीच आहे न की १ ते ५ % पर्यंतच मर्यादित आहे.

1 comment:

गिरिराज said...

waa waa... CA baddal barech gairsamaj aahet.. duur karanyaachaa prayatn khup aavaDalaa... asech ICWA baddalahi vaachaayalaa aavaDel