Tuesday, 26 June 2007

हुशारी लागते?

मि खुपदा लोकांच्या तोंडुन ऐकतो कि सि ए करायचे म्हणजे ८० ते ९० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण किंवा अगदीच हुशार मुलगा/मुलगी असेल तरच धाडस करण्यात अर्थ आहे. प्रत्यक्षात तसे काहीच नाही. चार्टर्ड अकौंटंट कोर्स हा फक्त हुशार मुलांनीच करावा असे काहिही नाही. सध्याच्या नविन बदलानुसार फक्त ५० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण असलेल्या कोणत्याही शाखेच्या विद्यर्थ्याला (१० वी/१२ वी नंतर आणि पदविनंतर) सि ए साठी प्रवेश घेता येतो. म्हणजेच सर्वसाधारण बुद्धिमत्ता असणाऱ् या विद्यार्थ्याला सुद्धा हे दार उघडे आहे. कारण मि याआधीच्या लेखात नमुद केल्याप्रमाणे याचे स्वरुप पुर्णपने वेगळे असल्यामुळे प्रवेश घेतल्यानंतर जो कष्ट घेतो आणि मनापासुन अभ्यास करतो तोच या स्पर्धेत टिकु शकतो. दुसरे असे कि हुशारी हि काही ऊपजतच येते असे नाही. सततचे वाचन, चिंतन, आणि लेखन यातुनच ठराविक विषयामध्ये प्राविण्य प्राप्त करता येते. सि ए च्या कोर्ससाठी सर्वात महत्वाची बाब आहे ती म्हणजे 'जिद्द'. ती जर का तुम्ही सोडली नाही तर हुशारी आपोआपच येते. त्यामुळे चालत आलेल्या अफवांवर विश्वास न ठेवता माहितीगार व्यक्तिंकडुन मार्गदर्शन घेणे कधीही योग्यच ! नाहीतर हे व्यासपिठ आपल्यासाठी खुले आहेच.

No comments: